बिडकीन, (प्रतिनिधी): मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात छावा महाराष्ट्र सेनेने आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षण उपसमितीचे पाटील राधाका तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात छावा महाराष्ट्र सेनेचे प्रमुख किशोर पाटील शिवत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. शिक्षण, नोकरी व स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजातील युवक-युवतींना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असल्याने समाजामध्ये सरकारविरोधात नाराजी आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उपसमितीकडून अपेक्षित ठोस आणि परिणामकारक कार्य होत नाही. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाच्या भावना आणि मागण्यांबाबत अपेक्षित गांभीर्य दाखविले आली आहे.











